Breaking News

स्वराज्य क्रीडा व सामाजिक प्रतिष्ठानचे चार खेळाडू राज्याच्या संघात


नगर । प्रतिनिधी -
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, नांदेड जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच नांदेड पोलिस ग्राऊंड येथे झालेल्या 11 व्या राज्यस्तरीय मिनि सबज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेत नगरमधील स्वराज्य क्रीडा व सामाजिक प्रतिष्ठानच्या 4 खेळाडूंनी यश मिळविले. या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

लक्ष्मी रुपेश चव्हाण (सेक्रेड हार्ट स्कूल), श्रेया गहिले (व्ही. आर. डी. ई. स्कूल), अथर्व गणेश पैंजने (रेणावीकर विद्यालय), ऋतुजा परमेश्वर कसाळ (त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, नेवासा) या खेळाडूंनी यश मिळविले.
या खेळाडूंना जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा व प्रशिक्षिका डॉ. शुभांगी रोकडे-दळवी, सचिव व मुख्य प्रशिक्षक अभिजित दळवी, किशोर बेरड, सचिन घावटे, अभिजित रिंधे, डॉ. विठ्ठल नरके यांचे प्रशिक्षण मिळत आहे.
विजयी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश शेटे, सुनील चावरे, स्वराज्य क्रीडा व सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सरोज आनंद दळवी, उपाध्यक्षा पल्लवी रुपेश चव्हाण, मीरा सुनील बेरड, द्वारकाबाई ढोकणे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धा दि. 23 ते 27 ऑक्टोबरदरम्यान विजयवाडा येथे होत आहे.