Breaking News

आत्महत्याग्रस्तपिडित कुटुंबियांना धनादेश प्रदान


घोटण / प्रतिनिधी:

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान आरक्षण मागणीच्या मुद्द्यावरून आत्महत्या केलेल्या एकूण ३६ कुटुंबियांना आ. तानाजी सावंत यांच्यातर्फे प्रत्येकी १ लाख रुपयांच्या धनादेशाचे नुकतेच वितरण करण्यात आले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. 

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा दुर्गा थोरात आणि कोपर्डी येथील निर्भयाचे वडील सामाजिक कार्यकर्ते बबनराव सुद्रिक यावेळी उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील गोकुळ काशिनाथ घुमरे आणि अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्था राधाबाई काळे या महाविद्यालयातील नुकतीच शिक्षण घेत असलेली तरुणी किशोरी बबन काकडे {रा. कापूरवाडी ता. नगर} या दोन्ही आत्महत्याग्रस्त पिडित कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी दुर्गा थोरात व कोपर्डीचे सामाजिक कार्यकर्ते बबनराव सुद्रिक यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत, महेश डोंगरे, संगीता पाडळे, श्वेता पवार आदींसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले समाजबांधव उपस्थित होते.