Breaking News

पं.स.च्या हलगर्जी पणामुळेच टँकर प्रस्ताव पडून-आ.पवार


गेवराई,(प्रतिनिधी): मराठवाड्यात यावर्षी सुध्दा दुष्काळाचे सावट आहे यांची मला पण जाणीव आहे त्यामुळे गेवराई तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाई आहे या संदर्भात गेल्या महिन्या पासून गेवराई तालुक्यातील पाणी टॅकर आवश्यक असलेल्या गावांना टॅकर सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल करण्याचे आव्हान मी केले होते त्यामुळे अनेक गावांनी पाणी टँकर प्रस्ताव पंचायत समिती गेवराई येथे दाखल केले आहेत पण पचायंत समीच्या निष्क्रिय कारभारा मुळेच अनेक गावांचे पाणी टॅकर प्रस्ताव धुळखात पडून आसल्याचा आरोप आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकात केला आहे.यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पञकात ते म्हणाले कि गेवराई तालुक्यातील पाणी टँकर सुरू करण्यासाठी मी गेल्या महिन्या पासून स्वतःहा पाठपुरावा सुरू केला होता त्या दरम्यान तहसील कार्यालयात माहिती घेतली असता पचायंत समीती कडून प्रस्तावच आले नसल्याची माहिती मला मिळाली होती . त्या नंतर पचायंत समीती कडे चौकशी केली पण तिथे तर पाणी पुरवठा विभागांतील आधिकारी व कर्मचारीच जाग्यावर नसतात त्यामुळे वारवार सुचना देऊन पाणी टँकर सुरू करण्यासाठी पचायंत समीतीच्या ढिसाळ कारभारा मुळेच दिरंगाई होत असल्याचा आरोप आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे मी दि.५ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी यांनी दाखवलेल्या निष्क्रियेतेची लेखी तक्रार सुध्दा केली आसल्याचे आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी यावेळी सांगितले तसेच गेवराई तालुक्यातील टॅकर प्रस्ताव संदर्भात माहिती घेतली असता त्या ठिकाणी काही गावचे फक्त प्रस्तावच पडून आहेत कुठलीही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे माझ्या लक्षात आले त्यानतंरच मी बि.डी.ओ. व सबंधीत आधिकारी व कर्मचारी यांची लेखी तक्रार केली होती.