Breaking News

माजलगाव शहरात युवकाची आत्महत्या


माजलगाव, (प्रतिनिधी):-विषारी औषध पिऊन एका २० वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवार रोजी शहरातील बिलाल नगर भागात घडली. शहरातील बिलाल नगर भागात राहणारे विश्वनाथ शिंदे या आचारी काम करणार्‍या मजुराचा वीस वर्षीय तरुण मुलगा दीपक विश्वनाथ शिंदे याने बुधवार रोजी अज्ञात कारणाने विषारी औषध पिले. काही वेळा नंतर ही बाब नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याची प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान गुरुवार रोजी पहाटे साडेपाच वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत पिताच्या खबरीवरून शहर पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.