Breaking News

परळीत भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसचा कंदील मोर्चा


परळी (प्रतिनिधी)- अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाविरोधात जनतेच्या मनात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काल वीज वितरण (पॉवर हाउस)वर कंदील मोर्चा काढण्यात आला.

वीज भारनियमन रद्द झाले पाहिजे अशा घोषणा देत हातात कंदिल घेऊन सायंकाळी ७ वाजता गणेशपार पासून पॉवर हाउसवर कंदील मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे.
भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणा-या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे.