Breaking News

व्यवसायवृध्दीसाठी कष्टाची तयारी हवी : महंत सुनिलगिरी


नेवासा प्रतिनिधी

सुशिक्षित तरुणांनी नाउमेद न होता व्यवसायाच्या माध्यमातून जीवनाचा उत्कर्ष करावा. चिकाटीने व मेहनतीने व्यवसायात वृद्धी करावी, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांनी केले. नेवासाफाटा येथील ज्ञानेश्वर सोमुसे यांनी सुरू केलेल्या केकशॉप दालनाचे उदघाटन महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. बाळासाहेब मुरकुटे, औरंगाबाद येथील फूड प्रॉडक्शनचे संचालक डॉ. बालाजी गलधर, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड. वसंतराव नवले, हभप विष्णू महाराज सांगळे, अँड. बापूसाहेब चिंधे, माजी सरपंच विजय गाडे, नगरसेवक डॉ. सचिन सांगळे, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोपान सोमुसे यांनी आभार मानले.