Breaking News

एलईडी बसवण्याचा नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ


बीड (प्रतिनिधी)ः- केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमा अंतर्गत असलेल्या एनर्जी ईफिसीयन्सी सर्व्हीसेस लिमिटेडच्या माध्यमातून एसको तत्वावर एलईडी दिवे बसविण्याच्या कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते चांदणी चौक या ठिकाणी सोमवारी करण्यात आले. 

यावेळी मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, सभापती मुखीद लाला, विकास जोगदंड, सादेक भाई, नगरसेवक जलील खान पठाण, सादेक जमा, ईलियास भाई, मुन्ना भाई, सोनू भाई, शेख जक्कोउद्दीन, कपिल मुने, कृष्णा मुने, साजेद जहागीरदार, हामेद चाऊस, नागेष तांबारे, कामरान शेख, विशाल मोरे, दोस मोह्हमद खान जहागीदार, अर्जुन भालशंकर, आकाश भालशंकर, महादेव सोनटक्के व न.प.चे अधिकारी, कर्मचारी परिसरातील नागरिक उपस्थित होते.शहरात हे ११००० नवीन एलईडीसह जवळपास १५०० पोल बसवण्यात येणार आहेत. आ.जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातुन सुरु झालेल्या या कामामुळे शहरवासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या योजनेमुळे न.प.ची साडेतीन कोटी रुपये विजबीलात बचत होणार आहे. केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच ही योजना बीड शहराला मिळाली आहे.