Breaking News

अळसुंदेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात


कुळधरण :प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामा अनारसे होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मुख्याध्यापक वसंत चटाले, बाळासाहेब साळुंके, नारायण नेटके, सुभाष तनपुरे, छगन गदादे, तुकाराम गाडे, भानुदास गार्डी, देवराव अनारसे, गोपीनाथ गाडे, साहेबराव गदादे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अनिल टकले, दत्तात्रय अनारसे, सोमनाथ अनारसे, नरसिंग साळुंके, कुशाबा साळुंके, हरी गदादे, समीर यादव या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.