Breaking News

जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेतून उत्तम खेळाडू घडतील-नाटकर

गेवराई (प्रतिनिधी)- माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि क्रिडा क्षेत्रातील कार्य महान आहे. कबड्डी खेळात त्यांचे विशेष योगदान आणि विशेष म्हणजे ते उत्तम खेळाडू म्हणूनही परिचीत आहेत. दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या शालेय क्रिडा स्पर्धेतून उत्तम खेळाडू घडतील असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले. माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथे शालेय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गेवराई येथील शारदा विद्यामंदीराच्या मैदानावर शुक्रवार दि.१२ आँक्टोबर रोजी संस्था अंतर्गत शालेय मुला मुलींच्या खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेचे सचिव जयसिंगपंडित आणि जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी युवानेते तथा क्रिडा मार्गदर्शक रणविर पंडित, बाजार समितीचे संचालक आरुण चाळक, नगरसेवक शाम येवले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना रणविर पंडित म्हणाले की, खेळात जय आणि पराजय असतो. प्रत्येक खेळ आपण खिलाडू वृत्तीने खेळला पाहिजे. त्यामुळे एक संघ व एकीची भावना निर्माण होते. मन प्रसन्न राहते. शरीर हे तंदुरुस्त राहते. भविष्यात आपल्या तालुक्यातुन खुप चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की या स्पर्धासोबतच आपण ज्या क्रीडाप्रकारात भाग घेताल, जसे फुटबॉल, व्हॉलीबॉल , क्रिकेट आदी खेळांची पूर्ण तयारी करून घेण्यात येईल यासाठी आपली संस्था सर्वतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी दादांच्या कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळात सुद्धा आपले नाव कमवावे असे म्हणाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मैदान पुजन करुन स्पर्धेला प्रारंभ झाला. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांचे संघ यावेळी स्पर्धेत सहभागी झाले. या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, प्राचार्य डॉ.पटेल, राजेंद्र घुम्बार्डे, किशोर पंडित, वसंत राठोड, सोपान राठोड, बाळासाहेब पंडित, मुख्याध्यापक खाजेकर, टाकले यांच्या सह क्रीडा मार्गदर्शक पंच प्रभाकर घोडके, आतकरे गणेश, तौर सर, नवपुते चंद्रकांत उपस्थित होते.