Breaking News

ऑक्टोबर महिन्यातील रविवारी मतदार नोंदणीची विशेष मोहिम


म्हसवड (प्रतिनिधी) : माण विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी मोहिम सुरू असून ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मोहिम सुरू असून प्रत्येक गावातील 18 वर्षे पुर्ण असलेल्या युवक-युवतींनी आपली नावे समाविष्ट करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. 
नवीन मतदार नोंदणी मोहिम सुरू असून 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील 7, 14, 21, 28 या तारखेच्या प्रत्येक रविवारी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी मतदारांना या मोहिमे अंतर्गत नाव नोंदणी करणे सोईचे व्हावे यासाठी ही विशेष मोहिम आखण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत वय 18 वर्षे पुर्ण होणार्‍या नवीन मतदारांनी कागद पत्रांसह मतदान केद्रस्तरिय अधिकार्‍यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार सौ. बी. एस. माने यांनी केले आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी जन्माचा, शाळा सोडल्याचा दाखला, किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटस, रहिवासी दाखल, ग्रामसेवक किंवा तलाटी यांचे सहीचा असावा. आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच घरातील एका व्यक्तीचे ज्याचे नांव अगोदर मतदार यादीत समाविष्ट आहे त्याच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स आवश्यक असल्याची माहिती निवडणूक नायब तहसिलदार सौ. भक्ती सरवदे यांनी दिली.