Breaking News

शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित रहा : प्रा. गाडे

कर्जत प्रतिनिधी 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दि. २१ नगर येथे भव्य मेळावा होत आहे. यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले. कर्जत तालुक्यातील सैनिकाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते घनशाम शेलार, मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे, उपसभापती प्रशांत बुद्धीवंत, कर्जत शहरप्रमुख गणेश क्षीरसागर, नागापुरचे सरपंच बाळासाहेब निम्बोरे, शेतकरीसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी नवले, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय तोरडमल, संजय शेलार, भाऊ शेंडगे, सचिन गदादे, दिनेश थोरात, आदी सह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. शेवटी कर्जत शहरप्रमुख गणेश क्षीरसागर यांनी आभार मानले.