Breaking News

नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


बीड :(प्रतिनिधी)- शहरातील विप्रनगर येथील जय माता दी वैष्णोदेवी मंदिरात येत्या बुधवार दि.१० ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर संस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते घटस्थापना होऊन महाआरती होईल. या प्रसंगी भाविक-भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैष्णादेवी मंदिर संस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष सोहणी व पदाधिकार्यांनी केले आहे. जम्मू (कटरा) येथील वैष्णोदेवी मंदिराच्या धर्तीवर बीडमध्ये गत ११ वर्षापूर्वी जय माता दी वैष्णोदेवी मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंदिरात वैष्णोदेवीसह महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीसह नव दुर्गांच्या मुर्ती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. नवरात्रोत्सवात दरवर्षी या मंदिरात दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भाविकांची गर्दी होत असते. यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते घटस्थापना होऊन महाआरती होणार आहे. तसेच याच दिवशी सायंकाळी ७ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, तिरूमला ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कुटे, जिल्हा व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष प्रमोद निनाळ यांच्या हस्ते सहकुटूंब देवीची आरती होणार आहे.तत्पूर्वी बुधवारी पहाटे ५ वाजता यजमान संतोष सोहणी, सौ.अर्चना सोहणी यांच्यासह जगन्नाथ सोहणी, रामबिलास सोहणी, संजय सोहणी, नितीन मंत्री, शिवप्रसाद दायमा, गोविंद तोष्णीवाल,वैष्णवी सोहणी, हर्ष सोहणी, जय सोहणी यांच्या हस्ते देवीला अभिषेक करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सकाळी व सायंकाळी देवीची महाआरती होणार असून या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. सप्तमीदिवशी नवचंडी याग, होमहवन तर नवमीदिवशी नवदुर्गा पूजन संपन्न होईल.नवरात्रोत्सवात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले राहणार आहे.