दर्शनासाठी जाणाऱ्या सात मुलांना कारची धडक; एक ठार


नाशिक - कालिका यात्रेत देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वडाळा गावातील सात बालकांना भरधाव कारने जाेराची धडक दिली. यात एका ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले. यापैकी दाेघांची प्रकृती गंभीर अाहे. रविवारी पहाटे ३.३० वाजता इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते साईनाथ चौफुलीवर हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. त्याच्याविराेधात 'हिट अँड रन' चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नामदेव पवार असे मृत मुलाचे नाव अाहे. या घटनेमुळे जखमी व मृत मुलांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget