Breaking News

महिला कला महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न


बीड (प्रतिनिधी)ः- येथील माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.सविता शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त इतिहास विभागाद्वारे महात्मा गांधी विचार आणि कार्य या विषयावर सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दि. ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत एकुण २९ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. सदरील स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थीनींनी यश संपादन केले. 

अमृता भरत चव्हाण बी.ए. प्रथम वर्ष, बी.ए. द्वितीय वर्ष- रोहिणी गोरख खामकर या विद्यार्थीनींनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. तर बी.ए. तृतीय वर्ष मोहिनी भास्कर मंचरे व नेहा बाबासाहेब कुटे या विद्यार्थीनींनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच उत्तेजनार्थ बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या अंकिता उत्तम जाधव व काजल शेषेराव ढवळे या विद्यार्थीनींनी मिळवला. स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी सहा. प्रा. रविंद्र ढास, सहा.प्रा.डॉ. संध्या आयस्कर यांनी सहकार्य केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इतिहास विभागाचे सहा.प्रा. मोहन काळकुटे यांनी काम पाहिले. स्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्या आणि यशस्वी विद्यार्थीनींचे प्राचार्य, शिक्षक यांनी प्रोत्साहन देवून अभिनंदन केले.