Breaking News

सातारा प्रकल्पग्रस्तांच्या घरातून लॅपटॉप, फ्रिजसह कपड्यांची चोरी


सणबूर (प्रतिनिधी) : वांग-मराठवाडी धरणामुळे पुनर्वसन करण्यात आलेल्या पुनर्वसित घोटील या तळमावले (ता. पाटण, जि. सातारा) परिसरातील दोन प्रकल्पग्रस्तांच्या घरी चोरी झाली आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर चोरट्यांनी दागिन्यांसह फ्रिज तसेच घरातील कपडे, पैशाचा डब्यासह अन्य साहित्य लंपास केल्याचे उघड झाले आहे.

चोरट्यांनी रामचंद्र कृष्णा माने आणि यशवंत भाऊ माने या दोन प्रकल्पग्रस्तांच्या घरात चोरी केली आहे. यशवंत माने यांचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्याने घरी चार ते पाच लॅपटॉप ठेवले होते. या लॅपटॉपसह यशवंत माने यांच्या घरातील साड्या, पैसे ठेवलेला डबा, फ्रिज असे साहित्य चोरट्यांनी चोरून नेली आहे. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू आहे.