आगामी काळात दुष्काळी जनतेला कालव्यांद्वारे पाणी देणे, हाच आपल्या जीवनाचा ध्यास: आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी

देवकौठे येथील ग्रामस्थांनी दुग्ध व्यवसायातून खूप मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे यावर्षी ५५ लाख रुपयांचे रिबेट गावात मिळणार आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही या गावाने लोकवर्गनीतून सुमारे एक कोटी रक्कमेची विद्यालयाची इमारत उभी केली आहे. येथील एकोपा, परिस्थितीव मात करण्याची जिद्द, केलेला विकास ए सारे इतर गावांसाठी दिशादर्शक आहे. आगामी काळात दुष्काळी जनतेला कालव्यांद्वारे पाणी देणे, हाच आपल्या जीवनाचा ध्यास आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. 
तालुक्याच्या टोकावर असलेल्या देवकौठे गावात करण्यात आलेल्या विकासकांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी आ. थोरात यांचे जल्लोषात स्वागत केले. तत्पूर्वी महंत शांतिगिरी महाराज यांच्या मिरवणुकीने देवकौठे गावात पार पडलेला हा सोहळा संस्मरणीय ठरला. 

यावेळी बोलतांना आ. थोरात म्हणाले, देवकौठे गावाने सातत्याने विकास कामांना पाठिंबा दिला आहे. तालुक्यातील वातावरण सलोख्याचे असून या भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण आपण पूर्ण केले आहे. तालुक्यातील जनतेमुळेच राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीत संधी मिळाली. दोन वर्षात देवकौठे येथे ३ कोटी ८८ लाखांची कामे केली आहेत. यापुढेही विकासकामांचा हा वेग असाच कायम राहिल. याप्रसंगी देवकौठे येथे रमाजी गेणूजी पाटील कहांडळ विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास महंत शांतिगिरी महाराज, आ.. डॉ. सुधीर तांबे, काशिकानंद महाराज, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, बाबा ओहोळ, भाऊसाहेब कुटे, संपतराव गोडगे, गजानन जुनंधरे महाराज, भारत मुंगसे, भागवत आरोटे, इंजि. सुभाष सांगळे, सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, प्रभाकर कांदळकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, राजाराम मुंगसे, मुख्याध्यापक संजय लहारे, सरपंच मंजुळा सांगळे, राजेंद्र कहांडळ, काशिनाथ कहांडळ, एकनाथ मुंगसे, सतिष आभाळे, शत्रुघन मुंगसे, संगीता सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी हनुमान मंदिर, कानिफनाथ मंदिर, देवी मंदिर, देवकौठे ते बहादरवाडी रस्ता यांसह विविध विकासकामांचे लोकार्पण झाले.

आ. डॉ. तांबे, दुर्गा तांबे, भारत मुंगसे, राजाराम मुंगसे, भागवत आरोटे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास गणपतसां गळे, साहेबराव गडाख, सचिन दिघे, अनिल कांदळकर, राजेंद्र मुंगसे, अनिल गाजरे, विलास मुंगसे, सजन मुंगसे, विश्‍वनाथ आरोटे, साहेबराव कहांडळ, मच्छिंद्र कहांडळ, ज्ञानेश्‍वर मुंगसे, बाळासाहेब गुडघे, अण्णा मुंगसे, सुरेश मुंगसे, अशोक मुंगसे, शरद शेवंते, सुमन मोकळ आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक संजय लहारे यांनी स्वागत केले. इंजि. सुभाष सांगळे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन प्रा. नामदेव कहांडळ यांनी केले. शेवटी राजेंद्र कहांडळ यांनी आभार मानले.

मंदिर आणि मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी 
आमदार थोरातांची भव्य मिरवणूकीसह हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी आमदार बाळासाहेब थोरात व मान्यवरांचे सजवलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल पथक, लेझीम पथक, झांझरी, वारकरी पथक,शेकडो महिलांनी डोक्यावर घेतलेले कलश, धार्मिक वातावरण, फुलांची उधळण व हजारो नागरिकांची उपस्थिती यामुळे ही मिरवणूक ऐतिहासिक ठरली. तर सत्यजित तांबे, इंजि. सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे, शत्रुग्न मुंगसे यांनी हेलिकॉप्टरमधून गावातील मंदिरांवर व मिरवणूकीवर पुष्पवृष्टी केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget