Breaking News

भावीनिमगाव येथे अखंड हरिमान सप्ताह


शहरटाकळी : प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे सालाबादप्रमाणे श्री जगदंबा मातेच्या नवरात्रोत्सवास उद्यापासून दि.१० प्रारंभ होत आहे. यानिमित्त जगदंबा मातेच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ५३ वे वर्ष आहे. शारदीय नवरात्रोत्सव काळात जगदंबा माता मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भावीनिमगाव येथील महा तपस्वी वै. हभप विठ्ठलनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने व हभप कृष्णदेव महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह साजरा होत आहे. सातव्या माळेला देवीची मोठी यात्रा भरणार आहे. पंचक्रोशीतील भक्तांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, वारकरी सेवा संघ व भजनी मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.