Breaking News

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या कमाईसाठी निर्मात्यांची नवी शक्कल


अमिताभ बच्चन आणि अामिर खान यांचा आगामी सिनेमा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सर्वत्र चर्चेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एक आश्चर्य वाटणारी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन आणि अामिर खान हे पहिल्यांंदा एकत्र सिनेमात दिसणार आहेत ही बातमी पसरताच अमिताभ आणि अामिर यांचं काम पाहण्यासाठी सिनेमाविषयी प्रेक्षकांचा उत्साह वाढत गेला.

यानंतर निर्मात्यांनी सिनेमाची कमाई वाढवण्यासाठी नवी शक्कल वापरण्याचा विचार केला आहे. ही बिझनेस स्टॅटर्जी याआधी रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटात वापरण्यात आली होती. 'संजू' सिनेमाचं एकूण बजेट 100 कोटी होतं. राजकुमार हिरानीने ही बिझनेस स्टॅटर्जी वापरल्यानंतर चित्रपटानं जवळपास 350 कोटींची कमाई केली. आता यशराज फिल्मसुद्धा याचा वापर करणार असल्याचं समजलं जातंय.