शुभेच्छा हीच जैन यांच्या कामाची पोचपावती : नाईकवाडे

जामखेड ता. प्रतिनिधी 

येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे मुकुल शाखाधिकारी जैन यांनी जामखेड शाखेत सेवाकाळात इमानेइतबारे केलेली सेवा ही कौतुकास्पद आहे. एखादया अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाला नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांसह अन्य समाज घटकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या, हीच जैन यांच्या प्रामाणिक कामाची पोचपावती आहे, प्रतिपादन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले. 
बँक ऑफ महाराष्ट्राचे मुकुल जैन यांची कुकाणा ता. नेवासा येथे बदली झाली. त्यानिमित्ताने बँकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने आज दि. १४ त्यांना छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी तहसीलदार नाईकवाडे बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, गटविकास अधिकारी अशोक शेळके, मंडळ कृषी अधिकरी सुंदरदास बिरंगळ, सकल मराठा समाजचे समन्वयक मंगेश आजबे, माजी पंचायत सदस्य शरद कार्ले, पत्रकार ओंकार दळवी, लियाकत शेख, संजय वारभोग, प्रकाश खंडागळे यांच्यासहा नागरिक, खातेदार उपस्थित होते. यावेळी बँकेचे अंकुर शुक्ला, महेश गायकवाड, दत्ता मेणा, संदीप शिदोरे, संदीप सुद्रिक, संदीप गायकवाड, धर्मराज गायकवाड, गायत्री ढवण आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, कृषी मंडलाधिकारी सुंदरदास बिरगळ, मंगेश आजबे आदींसह नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget