Breaking News

सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात घट


नवी दिल्ली : देशभरात वाढत्या इंधनाच्या दराबाबत आंदोलनं सुरू असताना केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले असून देशातील चार महत्त्वाची शहरं दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नईत दरवाढ कमी करण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात शनिवारपर्यंत पेट्रोल 87.46 रुपये लिटर तर डिझेल 79.00 रुपये लिटर होते. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी कमी करण्यात आलं आहे. इंधनाच्या दरात घट केल्यानंतर मुंबई शहरात पेट्रोलची किंमत 87.21 रुपये लिटर आणि डिझेल 78.82 रुपये लिटर आहे.