Breaking News

केंद्र सरकारच्या दरवाढीचा ‘गांधीगिरी’ने निषेध


जामखेड प्रतिनिधी 

‘एकही भूल कमल का फुल, गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना युवक काँग्रेसच्यावतीने गुलाबाचे फुल देऊन केंद्र सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल गांधीगिरी करण्यात आली. 

जामखेड युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शहरातील बीड रोड येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे अप्रत्यक्षपणे इतर सर्व जीवनावश्यक वस्तू तसेच शेती मशागत ही महाग झाली आहे. या 'अच्छे दिन'चा युवक काँग्रेसकडून आणि नागरिकांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी कर्जत-जामखेड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अप्पासाहेब डोके, शंतनू निंबाळकर, विठ्ठल अडाले, दादा मेंगडे, रवी बांगर, अड. महारुद्र नागरगोजे, ईश्वर खैरे, भैय्या पोटे, लहू रेडे, कालिदास मगर, आकाश गोयकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.