नाशिकमध्ये शनिवारी पुन्हा वॉक विथ कमीशनर

नाशिक / प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या वतीने "वॉक विथकमिशनर" "walk with commissioner" याउपक्रमाची 21/04/2018 सुरुवात करण्यात आली असुन याअंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवार दिनांक 20/10/२०१८ रोजी "शिवराम वझरे नगर जॉगिंग ट्रॅक,गोविंद नगर, नाशिक येथे सकाळी ६:३० वा.महानगरपालिका अधिका-यांसह उपस्थित राहुन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नाशिकमहानगरपालिकेच्या वतीने "walk with commissioner" या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक 20/10/२०१८ रोजी सकाळी ६:३० वा.शिवराम वझरे नगर जॉगिंग टूँक गोविंद नगर नाशिकयेथे होणार आहे.


या उपक्रमांतर्गत महानगरपालिका आयुक्त श्री तुकाराम मुंढे महानगरपालिका अधिका-यांसह उपस्थित राहुन नागरिकांशी संवाद साधणारआहेत. नागरिकांशी थेट सुसंवाद साधुननागरिकांच्या मनपा संदर्भातील त्यांच्या व्यक्तिगत अडचणी/परिसरातील अडचणी/ नाशिक शहर विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना इत्यादी संदर्भात मागणी/सुचना प्रस्ताव जाणुन घेणार आहेत व त्यावर उचित कार्यवाही करणेबाबत प्रशासनास सुचना देणार आहेत.नाशिकमहानगरपालिकेच्या वतीने "walk with commissioner" या उपक्रमाअंतर्गत जेनागरिक आपल्या तक्रारी/सुचना/संकल्पना महानगरपालिका आयुक्त यांचेकडे सादर करु इच्छितात त्यांनी ते साध्या कागदावर लेखी स्वरुपातउपक्रमस्थळी संबंधित विभागीय कार्यालयप्रतिनिधींकडे स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तेथे जमा करावेत.

यावेळी नागरिक मनपा संदर्भातील त्यांच्या व्यक्तिगत अडचणी/परिसरातील अडचणी/ नाशिक शहर विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना इत्यादी संदर्भात मागणी/सुचना प्रस्ताव/संकल्पना महानगरपालिका आयुक्त यांचेकडे करु इच्छितात त्यांनी त्याबाबतचे प्रस्ताव साध्या कागदावर लेखी स्वरुपात उपक्रमस्थळी संबंधित विभागीय कार्यालयप्रतिनिधींकडे जमा करावेत व त्याठिकाणी सकाळी ६:०० वाजता पासुन उपस्थित असणा-या महानगरपालिका विभागीय कार्यालय प्रतिनिधीकडुन आपला टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा आणि टोकन क्रमांका नुसार महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावेत असे आवाहन मनपा समाजकल्याण उपायुक्तांनी केले आहे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget