सूज्ञ जवळेकरांची मने चांगल्याप्रकारे जाणली : पालकमंत्री प्रा. शिंदे

जामखेड ता. प्रतिनिधी

जवळा ग्रामस्थांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिले. जवळा गावाशी माझी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या जे मनात असते, ते आधीच माझ्या ध्यानात आलेले असते. एका अर्थाने सूज्ञ अशा जवळेकरांची मने मी चांगल्याप्रकारे जाणली आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या जवळा ते तरडगाव रस्त्याच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. जवळा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच प्रशांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल सरपंच शिंदेंसह सदस्यांचा पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जवळा ग्रामविकास पॅनलचे ज्येष्ठ नेते मुरलीधर हजारे होते. जामखेड तालुक्याचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सुर्यकांत मोरे, जामखेड व कर्जत भा. ता. अध्यक्ष रवी सुरवसे, अशोक खेडकर, जामखेड व कर्जतचे नगराध्यक्ष निखील घायतडक, व नामदेव राउत, ज्योती क्रांतीचे आजिनाथ हजारे, प्रशांत शिंदे, सरपंच वैशाली शिंदे, डॉ. भगवान मुरुमकर, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरने, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, सभापती सुभाष आव्हाड, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डचे सभापती गौतम उतेकर, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, पांडुरंग उबाळे, पृथ्वीराज वाळुंजकर, उपनगराध्यक्ष शाकिर खान, शहाजी पवार, डॉ. महादेव पवार, बाजीराव पठाडे, बिभिषण लेकुरवाळे, प्रकाश शिंदे, प्रशांत पाटील, सरपंच अनिल पवार, साहेबराव पांडूळे, नान्नजचे विद्यमान सरपंच डॉ. मोहळकर, माजी सरपंच संतोष पवार, मा पं. स. सदस्य मनोज राजगुरु, बांदखडकचे सरपंच केशव वनवे, उपसरपंच गौतम कोल्हे, गावातील नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदेंनी सरपंचांना दिली भेट

जवळा येथील बारव परिसरात पाझर तलाव मंजुरीचा शासन निर्णय घेऊनच पालकमंत्री प्रा. शिंदे जवळा येथे निघाले. जवळयाचे नवनिर्वाचित सरपंच प्रशांत शिंदे यांच्या माध्यमातून जवळेकरांसाठी या पाझर तलावासाठी एकूण ४ कोटी १५ लाख रुपयांच्या कामाच्या शासन निर्णयाची त्यांनी सरपंचांना खास भेट दिली.  

घेतला वसा टाकणार नाही

जवळा येथील वैशाली शिंदे यांना जनतेने इतक्या प्रचंड मतांनी निवडून दिले आहे, की जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रत इतक्या मोठ्या प्रमाणात सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले नसतील. मतदारांनी सामजिक व राजकीय जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जो वसा मी घेतला आहे, टाकणार नाही. 

प्रशांत शिंदे, युवा नेते. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget