Breaking News

आश्‍वासनाचा विसर !


राजकीय पक्षांनी जनतेला आश्‍वासने देताना ती पूर्ण होतील, अशीच द्यावीत. आश्‍वासनं पूर्ण करता येत नसतील, तर जनतेला स्वप्नांत गुंगवू नये. तसं केलं, तर जनतेचा भ्रमनिरास होतो. जनतेची स्मरणशक्ती कमी असते, असं उगीच कुणी समजू नये. जनता पाहते तोपर्यंत पाहते. तिची सहनशीलता संपली, की मग ती काहीही करायला तयार होते. महाराष्ट ्रातील शेतकर्यांना मोफत विजेचं असंच आश्‍वासन देण्यात आलं होतं; परंतु ते न पाळता आल्यानं जाहीरनाम्यात झालेली ती प्रिटींग मिस्टेक होती असं राज्यकर्त्यांनी सांगितलं; परंतु जनतेनं नंतर संबंधितांना धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याचं असंच आश्‍वासन दिलं होतं. जनता वारंवार त्या आश्‍वासनांची आठवण करून देत आहे.
अच्छे दिनाची तर जनता डोळ्यांत तेल घालून वाट पाहत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला भाव देण्याचं आश्‍वासन जाहीरनाम्यात तसंच वेगवेगळ्या प्रचार सभांतही देण्यात आलं होतं; परंतु नंतर महागाईचं कारण पुढं करून हे आश्‍वासन प्रत्यक्षात आणता येणार नाही, असं मोदी सरकारनंच सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. वेगवेगळे पक्ष जनतेला वारेमाप आश्‍वासनं देत असताना ती पूर्ण करीत नाही. त्यामुळं मागं निवडणूक आयोगानंच पक्षांना जाहीरनाम्यात आश्‍वासनं देताना ती कशी पूर्ण करणार, याचा उल्लेख करा, असं सांगितलं होतं; परंतु राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाची ती सूचना मनावर घेतली नाही. जनता विसरभोळी नसते. राजकीय पक्षांवरचा राग ती मतदानातून प्रगट करीत असते. नाराजीतून कधी कधी सत्तांतर घडविते, तर कधी कधी काठावरचं बहुमत देऊन योग्य वागण्याचा इशारा देत असते. कधी कधी तर आश्‍वासनांची पूर्तता केली नाही, तर जनतेच्या रागाचा कडेलोट होतो अन् मग मध्य प्रदेशासारखं मतं मागायला आलेल्या मतांऐवजी चपलांचा हार मिळाला होता याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.आजच पाच राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत.

भाजप सरकारनं निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्यानं देशातील नागरिकांमध्ये किती असंतोष आहे, याचा प्रत्यय भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये यापूर्वीच आला आहे.
राजस्थान, छत्तीसगड मध्य प्रदेशमध्ये या राज्यामध्ये विधानसभेचा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

मध्यप्रदेश मध्ये शिवराज सिंहसलग 15 वर्षां पासून मुख्यमंत्री आहेत. केंद्र व राज्य सरकारनं दिलेली आश्‍वासनं पूर्ण होत नाहीत. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. कायदा व सुव्यवस्थेची प रिस्थिती बिघडली आहे.
एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्य भगवं करण्याची घाई झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ग्रामीण भागातील निकाल भाजपला इशारा देण्यासाठी पुरेसे आहेत; परंतु हज हाऊस सह अन्य इमारती, रस्त्यांवरचे फलक भगवे करण्यात योगी सरकार धन्यता मानीत आहे. शेतकर्यांचे क र्जमाफ करूनही तेथील शेतकरी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. त्याकडं दुर्लक्ष केलं, तर भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसू शकतो; परंतु सरकारला त्याचं भान नाही. उत्तर प्रदेश विधानसभा मार्गावर व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसनजीक तसेच 1090 क्रॉसिंग जवळ शेतकर्यांनी बटाटे फेकण्यात आले. उत्तरप्रदेशात बटाटयाला कमी भाव मिळाल्यानंतर संतप्त शेतकर्यांनी लखनौत अनेक ठिक ाणी बटाटे रस्त्यावर फेकून दिले. सरकारनं मात्र हे समाजकंटकांचं कृत्य असल्याचं सांगितलं असलं, तरी वस्तुस्थिती समजावून घेण्याची सरकारची तयारी नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत देशातील शेतीविकासाचा दर साडेचार टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आला. त्यामुळं सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर कमी झाला, तरी सरकार अजूनही त्यातील गंभीरता लक्षात घ्यायला तयार नाही. जिल्हाधिकारी शेतकर्यांनीच बटाटे फेकल्याचं सांगत असताना सरकार मात्र समाजकंटकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहे. विधानभवन इमारतीभोवतालचे रस्ते धुण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. एकीकडं सरकार असं सांगत असताना भाजपशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय किसान मंचनं सरकारच्या बोलण्यात व वागण्यात फरक आहे, अशी टीका केली. आज शेतकर्यांनी लखनौत बटाटे फेकले. उद्या ते ऊ स, तांदूळ, गहू फेकतील. कृषीमालाचे भाव सुधारले नाही तर असं होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्यप्रताप शाही यांनी पूर्वीही शेतक र्यांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. आता तर हे पूर्वनियोजित कृत्य होतं, जे बटाटे फेकले ते सडलेले होते. बाजारपेठेत ते कुणी घेतले नव्हते. त्यामुळं योगी आदित्यनाथ सरक ारची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे कृत्य करण्यात आलं, असं जाहीर केलं आहे. सरकार असं गुर्मीत आणि भुलभुलैय्यात राहिलं, तर गुजरातमध्ये ग्रामीण भागातील शेतकर्यांनी जसा आसूड हाती घेतला, तसाच देशभरातील शेतकर्यांनी घेतला, तर आश्‍चर्य वाटणार नाही.