मेळाव्यास शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे- वरेकर, घुगे


बीड(प्रतिनिधी) येत्या २३ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे बुथप्रमुख व गटप्रमुखांच्या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यात येत आहेत. बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे होणार्‍या या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून सर्व बुथप्रमुख व गटप्रमुखांसह शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जिल्हा संघटक बप्पासाहेब घुगे यांनी केले आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रामकृष्ण लॉन्स, कॅनॉल रोड, बीड येथे होणार आहे. बुथप्रमुख व गटप्रमुखांच्या या आयोजित केलेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे बुथप्रमुख व गटप्रमुखांशी चर्चा करून आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत माहिती घेणार आहेत. या मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसह, शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख खा चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीरजी मोरे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी आदींसह इतर शिवसेना पदाधिकार्‍यांची मेळाव्यास उपस्थिती लाभणार आहे. सदर मेळाव्यास बुथप्रमुख व गटप्रमुखांसह शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे माजी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जिल्हा संघटक बप्पासाहेब घुगे यांनी केले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget