Breaking News

जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा


बुलडाणा,(प्रतिनिधी): येथील भारतीय इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. नगर परिषद, तसेच जागरण पहेल, डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक हात धुवा दिनाचे महत्त्व व उद्देश मुलांना त्याच्या व्यवहारात स्वच्छतेचे बद्दल तसेच साबणाने नियमित हात धुण्या संदर्भात प्रोत्साहन देण्यात आले. भारतात अस्वच्छतेमुळे कुपोषण, इन्फेक्शन, दस, इत्यादी आजार वाढत आहेत. 

या सर्व आजारापासून सुटका होण्यासाठी नियमित साबणाने हात धुणे हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. अस्वच्छतेच्या अभावाने व घाणीच्या प्रभावाने तसेच अतिसाराने भारतात दरवर्षी तीन लाख मुले दगावतात. परंतु जेवणाच्या आधी व शौचालयाचा वापर केल्या नंतर साबणाने हात धुतल्यास ते प्रमाण कमी करता येऊ शकते, या बाबत किशोर तायडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच हात धुण्याच्या सहा योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापक आर. बी. गवई यांनी जागरण पहेल द्वारे केल्या जाणार्‍या कामाची प्रशंसा केली. तसेच शिक्षक सुधाकर बहुरूपे, अनिल वानखडे, हरिभाऊ मोरे, सुनीता भारसाखळे, संगीता बेलसरे, विद्या ढाले, अश्‍विनी मावळे, स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.