Breaking News

शंकरराव कोल्हे कारखान्याचे ११ ला अग्नीप्रदिपन


कोपरगांव प्रतिनिधी 

येथील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ दि. ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता बिपीन कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी संचालक सुभाष आव्हाड, सिंधू आव्हाड यांच्या हस्ते पूजन होणार असून अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे राहणार आहेत. सभासद शेतकरी बांधवांनी याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक जिवाजीराव मोहिते आदींनी केले आहे.