सीबीआयचा राजकीय फायद्यासाठी वापर काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका


नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) या संस्थेचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय फायद्यासाठी करत असून, सीबीआय म्हणजे सरकारकडून राजकीय सूड उगवण्यासाठी वापरले जाणार शस्त्र असल्याची टीका काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. सीबीआय विभागाचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतले असणारे गुजरात केडरचे अधिकारी राकेश अस्थाना सीबीआयमधील दुसर्‍या क्रमांकाचे अधिकारी होते. आता त्यांच्यावर लाचखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या काळात सीबीआय म्हणजे राजकीय हत्यार झाले आहे. अगोदरच रसातळाला पोहोचलेल्या या संस्थेत आता अंतर्गत युद्ध सुरु झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. राकेश अस्थाना हे 1984 च्या गुजरात केडरचे अधिकारी आहेत. गोध्रा येथे 2002 साली साबरमती एक्स्प्रेस जाळण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. तेव्हापासून अस्थाना हे नरेंद्र मोदींच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. सीबीआयने राकेश अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.

संचालक वर्मांवर मत्सरातून तक्रार 
सीबीआयने भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या संचालक आलोक वर्मा यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. सीबीआयचे दुसर्‍या क्रमांकाचे अधिकारी आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी वर्मा यांच्यावर लाचखोरीचे आरोप केले आहेत. मात्र, सीबीआयने संचालक वर्मा यांच्यावर मत्सरातून खोटी तक्रार केल्याचा दावा केला आहे. अस्थाना यांनी संचालक वर्मा यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला आहे. 

काय आहे प्रकरण 
सतिश बाबू साना यांनी सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना मागील एक वर्षापासून 3 कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याची माहिती दिली आहे. हीच माहिती एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहे. राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरमधील 1984च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. मांस व्यापारी मोईन कुरेशी यांच्या एका प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केली जात होती. या तपास यंत्रणेचे प्रमुख अस्थाना होते. मोईन कुरेशी यांच्याकडून 50 लाख रुपये घेतल्याने साना हाही चौकशीच्या फेर्‍यात होता. मागील वर्षी पोलीस उपाधीक्षक देवेंद्र कुमार यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान दुबईतील गुंतवणूकदार मनोज प्रसाद याने सीबीआयसोबत चांगले संबंध असल्याचे म्हटले होते. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget