दिंडोरी येथील महिलेची अडीच लाख रुपयांची ऑनलाईल फसवणुक


दिंडोरी ‍(प्रतिनिधी) - येथील आरती विसपुते या महिलेस एका भामटयाने युनियन बँक ऑफ इंडियांचे दिंडोरी येथे ग्राहक सेवा केंद्र मंजुर करुन देतो असे सांगुन दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणुक केल्याची बाब नुकतीच उडकीस आली असुन आरती विसपुते यांनी याबाबत नाशिक येथे सायबर पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र यामुळे दिंडोरी शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत ‍ सविस्तर माहिती अशी की, स्व्‍त:चा व्यावसाय असावा व आपल्या पतीच्या व्यावसायत हातभार लगावा या उद्रदेशाने श्रीमती‍ विसपुते यांनी बँक मित्रा या वेबवाईट वरील ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रासाठी अर्ज केला असता अमितकुमार या इसमाने बँक मित्रा या कंपनीचा टेलिमार्केटर असल्याचे भासवुन नोंदणी फी म्हणुन बँक मित्रा या नावाने बँक खात्यामध्ये रु.15600/- भरण्यास सांगितले त्यानंतर ‍रिझर्व बँक ऑफ इंडियांचे ओवरड्राफ्र ठेव म्हणुन पंन्नास हजार रुपये भरावे लागतील असे सांगुन पंन्नास हजार रुपये बँक मित्रा या कंपनीच्या नावावर भरण्यास भाग पाडले. परत सदर इसमाने फोन करुन स्थनिक गावच्या लोकसंख्येचा विचार करता तुमची रक्काम कमी पडत असुन परत पंचवीस हजर रुपये भरावयास लावले. त्यानंतर फोन करुन सांगितले की, तुमचे 75,000/- व कंपनीचे 75,000/- असे दिड लाख रुपये‍ रिझर्व बँकेत आपले जमा झाले असुन तसा मोबाईल संदेश पाठवला त्यानंतर कंपनीकडुन दिल्या जाणाऱ्या उपकरणांचे डिपॉझीट म्हणुन 65,000/- रुपये भरणा केले गेले. याच सबबीखाली परत 59,000/- रुपये भरणा केले. आठ दिवसानंतर अमित कुमार यांनी फोन वर सांगितले की, रिझर्व बँक व कंपनीचे तीन व्यक्ती दिंडोरी येथे येणार असुन त्यांचा राहणे, येणे-जाणे आदि खर्चापोटी 45,000/- रुपये दयावे लागतील ही रक्काम पण आम्ही त्यांच्या बँक खात्यामध्ये भरली आहे. पैशांच्या सतत मागणीमुळे विसपुते यांना संशय आल्यानंतर अमितकुमार यांच्याशी संपर्क साधला असता व त्यांना सर्व परत करण्याची मागणी केली असता मागे भरलेली रक्काम परत हवी असल्यास परतावा रक्काम म्हणुन 52,520/- आमच्या खात्यामध्ये पाठवा अशी मागणी केली. त्यामुळे आणखी संशय बळावला तरी बँक मित्रा या कंपनीची सखोल चौकशी करुन आमची जी फसवणुक झाली त्यांना कडक शासन करण्याची मागणी श्रीमती विसपुते यांनी केली आहे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget