Breaking News

योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत डॉ. खुरसाळे यांचे पॅनल विजयी


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- येथील अतिशय प्रतिष्ठित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या पॅनलनी विरोधी पॅनलपेक्षा ३४१ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. या विजयासह सलग चौथ्या वेळेस हि संस्था सभासदांनी पूर्ण विश्वासाने डॉ. खुरसाळे यांच्या सारख्या कठोर प्रशासकाच्या हाती सोपविली आहे. शंभर वर्ष पूर्ण करणारी प्रसिध्द शिक्षण संस्था म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्था सर्वपरिचित आहे. संस्थेचे कर्मचारी व इतर नागरिक असे ९४३ सभासद आहेत. रविवारी (ता. २१) संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यात डॉ. खुरसाळे यांचा योगेश्वरी पॅनल आणि प्रमोद देशपांडे यांचा स्वामी रामानंद तीर्थ पॅनल यांच्यात चुरशीचा सामना रंगला. आज दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत ६६८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर लागलीच मतमोजणी पार पडली. मतमोजणीअंती डॉ. खुरसाले यांच्या पॅनलला ४८८ मते पडली. तर प्रमोद देशपांडे यांच्या पॅनलला १४७ मते मिळाली. यावेळी ३३ मते बाद झाली. अखेर ३४१ मताधिक्य घेऊन डॉ. खुरसाळे यांचे पॅनल विजयी झाले. निकाल जाहीर होताच फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून ऍड. शरद लोमटे व निवृत्त प्राचार्य अशोक पत्की यांनी काम पाहिले.