Breaking News

लैंगिक शोषणाविरोधात समिती नेमणार : मेनका गांधी


नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण तापत चालले असून, अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी न्यायाधीश व कायदेतज्ञ यांची समिती नेमण्याची घोषणा केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केली. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणांचा थेट उल्लेख न करता, रात्रपाळीत काम करणाऱया महिलांना संरक्षण देईन व स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करेन, असे जाहीर केले. नाना पाटेकर, परराष्ट्र राज्यमंत्री एम. ज. अकबर, साजिद खान यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्या विरोधत विविध क्षेत्रांतील महिलांनी ‘मीटू’ मोहीमच सुरू केली आहे. 

कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला.मनेका गांधी यांनी ही प्रकरणे लावून धरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अकबर यांना राजीनामा द्यावा लागेल, असे दिसते. ते नायजेरियाहून गयाना येथे गेले आहेत. ते बहुधा रविवारी परततील. बॉलीवूडमध्येही लैंगिंक शोषणाविरुद्ध आवाज उठत आहे. ‘हाऊसफुल्ल-4’ चे दिग्दर्शक साजिद खान यांना डच्चू देण्यात आला. त्यांच्यावरही दोन महिलांनी शोषणाचा आरोप केला आहे. अक्षयकुमारने आपण साजिद खानसोबत काम करणार नाही, असे जाहीर केले. त्याच्या इशार्‍यामुळे खळबळ माजली. त्यामुळे आपण चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे साजिदने जाहीर केले. नानाही चित्रपटात नसतील, हे नंतर स्पष्ट झाले.