Breaking News

वृद्धेश्‍वर कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा


घोटण/प्रतिनिधी:
वृद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना हा पाथर्डी शेवगाव या दुष्काळी भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची कामधेनु आहे.गेल्या 2 ते 3 वर्षापासुन ऊस उत्पादक शेतकर्‍यावर ऊस दराबाबत सातत्याने अन्याय होत आहे.कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असुन,गत हंगामातील ऊसाला रिकव्हरी सुद्धा चांगली मिळाली आहे.परंतु ऊस दराबाबत कारखान्याने आसपासच्या व शेजारच्या सहकारी साखर कारखान्याने जो भाव दिला तो भाव देनेबाबत कारखाना प्रशासन नेहमी शेतकर्‍यावर अन्याय करत आहे.गतवर्षी ऊसाचे क्षेत्र या परिसरात जास्त असल्यामुळे ऊस तोडणी करताना शेतकर्‍याना वैयक्तिक व आर्थिक त्रास झाला ऊस पिका साठी रात्र-दिवस कष्ट घ्यावे लागते, शेतकर्‍यांना खत,मजुरी,लाईट बिल,फवारणी,आदींचा मोठ्या प्रमाणात खर्च येतो.दिवाळीपूर्वी शेजारील कारखान्यांनी जाहीर केलेल्या भावाची रक्कम तथा उर्वरित राहिलेल्या फरकाची रक्कम त्वरीत दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांचे खाती वर्ग करावी असे निवेदनात म्हणण्यात आले.आपल्या वृ.स.सा.का.दरवाढीबाबत काही हालचाल होताना दिसत नाही तरी या निवेदनाद्वारे आम्ही ऊस उत्पादक शेतकरी आपणास सूचित करतो की,येत्या दिवाळी पूर्वी 8 दिवस अगोदर आसपासच्या कारखान्यांनी दिलेला वाढीव भाव घोषित करून फरकाची रक्कम ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात आम्ही शेतकरी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन करणार असे निवेदनात म्हटले आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात संभाजी किसन वांढेकर,दातीर दत्तात्रय,राजेंद्र शिरसाठ,रमेश दातीर,माधव शिरसाठ,मधुकर ठुबे,राहुल राजेभोसले,संतोष काटे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.या प्रसंगी संकेत वांढेकर,संतोष पावसे,मोहित पारनेरे,मिलिंद गायकवाड,अर्जुन दराडे,आकाश शिरसाठ,गणेश काळे,साईनाथ शिंगटे, महेश कळकुटे,ज्ञानेश्‍वर कळकुटे आदी शेतकरी उपस्थित होते.