भारनियमन तात्काळ बंद करा : राष्ट्वादी , मनसेची मागणी; महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन


पाथर्डी प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात दि. ८ पासून महावितरण कंपनीने अचानकच भारनियमन सुरू केले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मनसेच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात महावितरण कंपनीचे उपअभियंता सिंग यांना निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीच्या निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचे भीषण हाल सुरु आहेत. नवरात्री महोत्सव सुरू झाला असूनही कुठलीही पूर्वसूचना न देता लोडशेडिंग करणे हा जनतेवर अन्याय आहे. हे बंद न झाल्यास महावितरणच्या कार्यालयामध्ये बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नवरात्र, दिवाळी तसेच मोहटादेवीला येणारे भाविक पहाटेपासून पायी येतात. शहारातील सर्व रहिवाशी वेळोवेळी वीज बिल भरत आहेत. असे असतांना भारनियमन कशासाठी केले जाते? शहर आणि तालुक्यात चोरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. अशा परिस्थितीत सुरु असलेल्या भारनियमनामुळे व्यापारी व व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य शिवशंकर राजळे, सिताराम बोरुडे, बंडू बोरुडे, चाँद मणियार, महेश बोरुडे, योगेश रासने, अजित चौनापुरे, योगेश वाळके, मनसेचे सुभाष घोरपडे, खंडू दिनकर आदी उपस्थित होते.

… तर तशी वेळच येणार नाही 

सध्या शहरात अनेक ठिकाणी राजरोसपणे आकडे टाकून वीज चोरी सुरु आहे. महावितरण कंपनी मात्र याकडे लक्ष देण्याऐवजी झोपेचे सोंग घेत आहे. अधिकारी केवळ भारनियमनाबाबतच जागरूक राहून वीजग्राहकांना अस्ताप देण्याचे काम इमानेइतबारे करत आहेत. जर वीज चोरी रोखली तर महावितरण कंपनीवर भारनियमन करण्याची वेळच येणार नाही. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget