Breaking News

कॉंग्रेस सेवादलच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश शिंदे


बीड (प्रतिनिधी)- बीड दि. कॉंग्रेस पक्षाचे अत्यंत महत्वाचे व सर्व सन्मान प्राप्त सेवा दल चे बीड जिल्हा मुख्य संघटक (अध्यक्ष) या पदावर योगेश शंकराव शिंदे या कॉंग्रेसच्या निष्ठावान युवकास संधी देण्यात आली आहे. शिंदे हे गेले कित्येक वर्षापासुन कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी, युवक कॉंगे्रसच्या विविध पदावरती कार्य करून पक्ष संघटना मजबुत करण्याचे काम केले आहे. व प्रत्येक कार्यक्रमास मोहिमेस योजनेस सकी्रय सहभाग नोंदवत पक्षाचे कार्य व विचार समाजातील तळागळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आले आहेत. पुणे येथे कॉंग्रेस भवन येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मा.अशोक चव्हाण साहेब यांच्या आदेशाचे संदर्भ देत तसेच अखील भारतीय कॉंग्रेसचे सेवादलचे मुख्य संघटक श्री. लालजी देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष मा.विलास ओैतडे यांच्या हस्ते कॉंग्रेस सेवादलाच्या बीड जिल्हा मुख्य संघटक (अध्यक्ष) या पदाचे नियुक्तीपत्र देउन पदभार सोपविण्यात आला. या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदी, प्रा.टी.पी मुंडे सर, शहादेव हिदोळे, महादेव धांडे, ऍड. कृष्णा पंडीत, ऍड. राहुल साळवे, फरिद देशमुख, नगर सेवक डॉ.इद्रीस हाशमी, विठ्ठल जाधव, बापुसाहेब चोैरे, ऍड. मोटे, सबदर देशमुख, विष्णू मस्के, सिराजभाई शेख, गोविंद साठे, शामसंदुर जाधव, शारेक पटेल, सरवदे मॅडम, खमर ईनामदार व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.