Breaking News

शेतकरी संघटनेचा मेळावा


बीड (प्रतिनिधी): १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे व मालती करपे या दोन शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तर २२ जानेवारी २०१८ रोजी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. दरम्यानच्या काळात ३२ वर्षाचा कालखंडात सुमारे ८० हजार शेतकर्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या बाबीची क्राईम रेकॉर्डसने नोंद घेतली. मात्रआतापर्यंतच्या सरकारमधील सत्ताधार्यांनी शेतकरी आत्महत्येबाबत काहीच ठोस पावले उचलली नाहीत.शेतकर्यांची लुट , शेतकरी विरोधी कायदे करून शेतकर्यांना आत्महत्येस परावृत्त केले जाते. हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे हा कलंक पुसण्यासाठी व शेतकर्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी दि.१५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता शेतकरी संघटनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनुरथ काशीद, मिलींद शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील उपस्थित राहणार आहेत.