Breaking News

थकीत पगारासाठी युवक काँग्रेसचे टोल प्रशासनास निवेदन


संगमनेर/प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरील कामगारांचे मागील सहा महिन्यांपासून पेमेंट थकले असून हे थकीत पेमेंट दिवाळीपूर्वी अदा करावे अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस व एन. एस. यु. आय ने केली आहे. हिवरगांव टोलनाका येथे टोल नाक्यावरील कामगारांचे थकीत पेमेंट मिळावे या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसने टोल प्रशासनास दिले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, सोमेश्‍वर दिवटे ,रमेश नेहे ,आनंद वरपे ,सुभाष सांगळे ,गौरव डोंगरे ,निलेश शिंदे ,मोहन गुंजाळ , विजय उदावंत , सोमनाथ गडाख , सुरज शिंदे , विजय राहणे , अमित गुंजाळ आदींसह सुमारे शंभर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे कि, हिवरगाव पावसा टोल नाक्यावरील कर्मचार्यांचे पगार मागील सहा महिन्यांपासून थकलेलेले आहे. यासाठी मा महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात , प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी टोल प्रशासनाची भेट घेतली. यावेळी नॅशनल हायवे वरील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, सर्व सर्विस रोड सुरु करावे, माझे घर सोसायटी घुलेवाडी जवळ उड्डाणपूल व्हावा. अशा विविध मागण्या केल्या. दिवाळी हा सर्वात मोठा व महत्त्वाचा सण असू दिवाळीपूर्वीच कामगारांचे सर्व पेमेंट अदा करा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारले जाईल. असा इशाराही युवक काँग्रेस व एन. एस. यु. आयच्या वतीने देण्यात आला आहे.