Breaking News

काकडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

चापडगाव प्रतिनिधी 

शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित आबासाहेब काकडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच पंडितराव नेमाने होते. विद्यालयाचे प्राचार्य निवृत्ती भांगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे उपप्राचार्य अशोक निकाळजे, शेषराव तहकिक, केदारेश्वराचे संचालक शेषराव महाराज बटुळे, जनशक्तीचे कैलास गोरे, शिवसेना तालुका प्रमुख भारत लोहकरे, चापडगाव सोसायटीचे चेअरमन तुकाराम मडके, ग्रा. पं. सदस्य सत्यनारायण मुंदडा, अशोक पातकळ, प्रल्हाद गायकवाड, प्रा. विठ्ठलराव गमे, शहाजी जाधव, रोहिदास पातकळ, काकासाहेब गोरे, अंकुश गोरे, भाऊसाहेब पाटील, शंकर गुंठे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राहुल जेजुरकर यांनी केले. के. डी. जाधव यांनी आभार मानले.