Breaking News

हुंदका’ काव्यसंग्रह पाहताच माणदेशाला भेट देण्याची सचिन तेंडूलकरांनी व्यक्त केली इच्छा

म्हसवड, दि. 8 (प्रतिनिधी) : भारतरत्न मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना त्यांचे वडिल स्व. रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते 35 वर्षापुर्वी स्व. कविवर्य माजी आमदार धोंडीराम वाघमारे लिखित माणदेशातील माणसांची दारूण व्यथा मांडलेला हुंदका हा काव्यसंग्रह अभय वाघमारे यांनी दिल्यानंतर सचिन तेंडुलकर हुंदका, काव्यसंग्रहाच्या जुन्या आठवणी जाणून घेत आजही दुष्काळग्रस्त माणदेशी माणसांच्या जीवनात काहीही फरक पडलेला दिसत नाही. हे ऐकून सचिन तेंडुलकर भावुक झाले तसेच त्यांनी माणदेशाला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली.
माण तालुक्याचे माजी आमदार स्व. धोंडीराम वाघमारे यांनी सन 1983 मध्ये दुष्काळग्रस्त माणदेशातील माणसांची दारूण व्यथा असलेला हुंदका हा कविता संग्रहाचे प्रकाशन भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे वडिल स्व. रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते केले होते. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना कविवर्य नारायण सुर्वे यांनी दिली होती. प्रकाशन सोहळ्यास माण तालुक्यातील स्व. माजी आमदार सदाशिवराव पोळ, माजी मंत्री दयानंद म्हस्के, स्व. दशरथ जगताप, प्रा. सोपानदेव माने, साहेबराव मोरे, पद्माकर वैद्य, बाबुराव रामिष्टे, निर्मला वाघमारे, के. के. सीता सावंत उपस्थित होते. यानंतर 35 वर्षांनंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर समवेत स्व. आमदार धोंडीराम वाघमारे यांचा मुलगा अभय वाघमारे हा अख्या भारतात प्रसिध्द व तेवढीच महत्वाची असणारी टाइम्स्‌ क्रिकेट शिल्ड ए-डिविजनमध्ये नवी मुंबईच्या डि. वाय. पाटील या संघाला विजेतेपद मिळाले त्या संघाचे प्रतिनिधित्व अभय धोंडीराम वाघमारे करतो. स्पर्धेत एकूण 8 संघांनी प्रवेश केला होता, प्रामुख्याने एअर इंडिया, बीपीसीएल, इंडियन ऑइल, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, टाटा या संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या महत्वाच्या स्पर्धेत डी. वाय. पाटील या संघाने स्पर्धा जिंकली होती. विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिलीप वेंगसरकर व प्रा.रत्नाकर शेट्टी कार्यक्रमास उपस्थित होते, अभय धोंडीराम वाघमारे यांनी सचिन तेंडुलकर यांना दिवंगत आमदार धोंडीराम वाघमारे लिखित हुंदका या काव्य संग्रहाची एक प्रत भेट म्हणून दिली.
यावेळी सचिन तेंडुलकर यांना त्यावेळी काढलेली काही छायाचित्रे दाखवली असता हे तर माझे बाबा आहेत. हा फोटो तुझ्याकडे कसा? असे विचारत अभय कडून अधिक माहिती जाणून घेतली असता 35 वर्षापुर्वी दुष्काळग्रस्त माणदेशातील माणसांची दारूण व्यथा असलेला हुंदका हा कविता संग्रह स्व. रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. हे सांगून माझ्या दुष्काळी माणदेशातील तडफडणार्‍या मनाला समर्पित केलेल्या या कवितेतील रानात जावे रान उदास दिसे घरात यावे घर भकास भासे चावडी वरल्या पारावर बसताना चिमुटभर तंबाखू कुणी देईना ही काव्य वाचून दाखवली असता माणदेशाची आवस्था व्याकुळ असल्याचे ऐकून सचिन भावुक होऊन माणदेशाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.