Breaking News

जेट एअरवेज आर्थिक संकटात

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने पायलट, इंजिनिअर्स, वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचार्‍यांना ऑगस्ट महिन्याचे बाकी वेतन चुकते केले. मात्र, सप्टेंबरचे वेतन मिळण्यास उशीर होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजने या कर्मचार्‍यांना ऑगस्टचे बाकी उरलेले 50 टक्के वेतन 26 सप्टेंबरला करणे अपेक्षित होते. मात्र, आर्तिक अडचणींमुळे एयरलाइन्स त्या रकमेच्या अर्धीच रक्कम देऊ शकली होती. उर्वरित रक्कम 9 ऑक्टोबला कर्मचार्‍यांना देण्यात आली. नॅशनल एविएटर्स गिल्डमधील एका जेट एयरवेज पायलट ने म्हटले की, ‘आम्हाला मंगळवारी वेतनातील बाकी उरलेली 25 टक्के रक्कम मिळाली. यासह ऑगस्ट महिन्याचे वेतनाची पूर्ण रक्कम मिळाली. मात्र, सप्टेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नाही. जेट एयरवेजचे सीपीओ राहुल तनेजा यांनी पायलट, एयरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनिअर्स आणि वरिष्ठ व्यवस्थापन टीमला मंगळवारी सांगितले की, ऑगस्टचे सर्वांना मिळाले असले, तरी सप्टेंबरचे वेतन मिळण्यास उशीर होऊ शकतो. सप्टेंबरचे वेतन लवकरात लवकर देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.