Breaking News

नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी पूर्ण


चांदा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील चांदा येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोहटादेवी जगदंबा उत्सव मंडळाची नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी जय्यत तयारी झाली आहे. नवरात्रौत्सवात बुधवार दि. १० ते गुरुवार दि. १८ या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी ह.भ.प. रोहिदास महाराज चांदेकर यांचे हस्ते घटस्थापना होईल. तसेच रोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, सायंकाळी ६ ते ७ देवीची आरती, रात्रौ ९ ते ११ ह. भ. प. चंद्रकांत महाराज खळेकर, रोहिदास महाराज चांदेकर, विजय महाराज कुहिले, (फत्तेबाद) किशोर महाराज खरात (सिन्नर), राम महाराज बोचरे (खरवंडी), दिपक जाधव, श्री क्षेत्र अमरबेट संस्थान, उमरगा, सोनाली काळे, ( चितळी-पाडळी), माधव महाराज पैठणकर येवला यांची किर्तनसेवा होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त नवरात्रौत्सव मंडळ व चांदा ग्रामस्थांनी केले आहे.