राफेल घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा


नवी दिल्ली - राफेल करारात झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात यावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केली आहे. सीबीआय मुख्यालयात जाऊन त्यांनी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची भेट घेतली.‘हिंदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) या कंपनीने यापूर्वीच सुखोईसारख्या 7 अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती केलेली आहे. सरकार सध्या त्यांच्या स्वत:च्या भुमिकेवरच ठाम नाही. एक खोटे लपवण्यासाठी त्यांना अनेक खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडाव्या लागत आहेत, असे अरुण शौरी यांनी म्हटले. 

आम्ही या प्रकरणाची काळजीपूर्वक चौकशी करू. तसेच वेळप्रसंगी योग्य ती भूमिका घेऊ, असे आश्‍वासन सीबीआय संचालक वर्मा यांनी दिल्याचे प्रशांत भूषण यांनी सांगितले.राफेल प्रकरणातील भ्रष्टाचाराविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी सीबीआयला सरकारची पगवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाचाही मार्ग पत्करता येऊ शकतो. केंद्र सरकार किंवा मंत्रालयाविरोधात एखाद्या व्यक्तीला स्वतंत्ररित्या सीबीआयकडे तक्रार दाखल करता येते. दरम्यान, याप्रकरणी सीबीआयचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget