Breaking News

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात

शेवगाव प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर आज दि. १६ शेवगावमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. पक्षनिरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील स्वराज मंगल कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली. यावेळी नंदकुमार मोरे यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दि. २१ रोजी अहमदनगरमध्ये व शिर्डीमध्ये शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभांसाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी पक्षनिरीक्षक नंदकुमार मोरे, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, अनिल कराळे, ज्येष्ठ नेते व माजी सभापती अँड. अविनाश मगरे, एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे, तालुका युवक प्रमुख शितल पूरनाळे, दीपक ढाकणे, महेश पुरनाळे, सुनील जगताप शहरप्रमुख भाऊ वाघमारे, सागर वाकडे, अंकुश लोंढे, विठ्ठल घुले, देविदास चव्हाण, उदय गांगुर्डे, रवी माळी, अशोक वाकडे, संजय आल्हाट, बाळासाहेब दसपुते, पुष्पा गर्जे, तालुका उपप्रमुख बाईजा बटुळे, सुलोचना खरात, संगीता सातपुते आदींसह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन सिद्धार्थ काटे यांनी केले. शहराध्यक्ष सुनील जगताप यांनी आभार मानले.