Breaking News

निराधारांचेही अनुदान वाढवून द्या-शेख मोहसीन,सय्यद फरहान


बीड,(प्रतिनिधी) : येथील समाजसेवक शेख मोहसीन, सय्यद फरहान यांनी वेळोवेळी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत निराधार, वृध्द, विधवा, अपंग, परिपक्ता महिला यांना अनुदान वाढवून देण्यात यावे अशी मागणी केली होती. शेख मोहसीन, सय्यद फरहान यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना भेटून उन्हाळी अधिवेशनात हा प्रश्‍न उचलावा अशी मागणी करून शासनातर्फे दिले जाणारे तुटपुंजे अनुदान वाढवून देण्यात यावे, अशी मागणी केली होती. यापैकी अपंग व्यक्तींना मिळणार्‍या अनुदानात शासनाने ४०० रूपयांची वाढ करून अपंग व्यक्तींना आता १ हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. परंतु आजही संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमाह केवळ ६०० रूपयेच अर्थसहाय्य दिले जाते पण ते आजच्या महागाईच्यादृष्टीने गुजराण होणे कठीण आहे. याकडेही शासनाने लक्ष देवून निराधारांचे देखील अनुदान वाढवावे अशी मागणी समाजसेवक शेख मोहसीन, सय्यद फरहान यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून प्रचलित पध्दतीनुसार निराधार, अपंग व्यक्तींना अनुदान दिले जात आहे पण महागाईच्या अनुषंगाने अत्यंत कमी होते, यात केवळ ६०० रूपये अनुदान मिळायचे यात निराधारांना आधार मिळत नसे म्हणून वेळोवेळी शासन दरबारी ही मागणी उचलून धरत अनुदान वाढ करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक शेख मोहसीन, सय्यद फरहान यांनी केली होती. याबाबत त्यांनी ना.धनंजय मुंडे यांची भेटही घेतली होती. ८० टक्के व अधिक दिव्यांग असलेल्या निराधार व्यक्तींना आता दर महिन्याला १ हजार रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मयार्दाही २१ हजारावरून ५० हजारपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांगांना याचा लाभ होणार आहे. शेख मोहसीन, सय्यद फरहान यांनी याबाबत शासनाचे आभार मानले आहेत.