Breaking News

बहुजन क्रांती आघाडी विधानसभा लढणार : आतार


राहुरी ता. प्रतिनिधी

येथे पार पडलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी अब्दुल आतार यांनी विधानसभेची उमेदवारी करावी, अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली. मंगळवारी दि. ९ शनि चौक येथे ही बैठक झाली. या बैठकीत बोलताना आतार यांनी बहुजन क्रांती राहुरीतून विधानसभा लढणार असल्याचे संकेत दिले. विधानसभेच्या उमेदवारासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. आगामी काळात गावोगावी बैठका घेऊन जनसंपर्क वाढविण्याचे या बैठकीत ठरले. याप्रसंगी संतोष वाघमारे, संजय संसारे, अक्षय भालेराव, संदीप पाळंदे, करण माळी, गणेश ऊंडे, विकास बोरुडे, सुनिता पवार, स्वप्निल खरात, फिरोज शेख, सादीक आतार, प्रकाश ओहोळ, सलमान तांबोळी, राजा भोरे, अमर सातोरे, सचिन गायकवाड, सलमा शेख, संतोष पाटील, लक्ष्मीकांत भालेराव, राजु घाडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.