Breaking News

हमीपत्र घेऊन वरिष्ठश्रेणी आणि निवड श्रेणी द्या


शेवगांव / प्रतिनिधी

शासनाच्यावतीने सद्यस्थितीत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शिबिर होत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक श्रेणीपासून वंचित आहेत. नजिकच्या काळात प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीवर पात्र शिक्षकांना लाभ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र पवार यांनी केली. यासंदर्भात त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांना निवेदन दिले असल्याचे शिक्षक परिषद संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी सांगितले. ते म्हणाले, नजिकच्या काळात काही शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शासनस्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम नियोजन नाही प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीवर संबंधित कर्मचाऱ्याकडून हमीपत्र घेऊन वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी लाभ देण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.