Breaking News

धारूर तालुक्याची चुकलेली आणेवारी दुरुस्त करण्याची भाजपची मागणी-अंगदराव मुंडे


किल्ले धारूर,( प्रतिनिधी,) धारुर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु प्रशासनाने चुकीची माहिती वरिष्ठांना दिली आहे त्यामुळे वस्तुस्थिती पाहणी करून आणेवारी ५०% टक्क्यांपेक्षा कमी दाखवावी अशी मागणी धारूर तालुका भाजपच्या वतीने तहसिलदार धारूर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे .याबाबत तहसिलदार धारुर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धारूर तालुका हा डोंगराळ भाग असून जमीन हलक्या प्रतीची आहे जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस धारूर तालुक्यात पाऊस झाला आह. त्यामुळे सर्व पिके हातातून गेली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.