Breaking News

सार्वजनिक वाचनालयाच्या मागण्यांचे विखेंना निवेदन

भेंडा / प्रतिनिधी

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना वाचन कृती समितीचे अध्यक्ष दीपक आगळे यांनी राज्यशासनाने सुरु केलेल्या ‘गाव तेथे ग्रंथालय’ या उपक्रमाअंतर्गत पगार वाढ व सेवा शर्ती लागू करण्यासंदर्भात निवेदन मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन दिले. 
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील दिपक आगळे वाचनालयात चळवळीत जनजागृती मोहिमीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते हे नेहमीच ग्रंथालय चळवळीत येणाऱ्या अडीअडचणी व त्यामागील ग्रामीण भागातील वाचनालयांना चालना देण्यासाठी अग्रेसर असतात. ग्रामीण भागातील वाचनालयांना नेहमीच महाराष्ट्र शासनाच्या वाचनालय अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणावर नेहमीच आगळे आवाज उठवतात. ग्रामीण भागातील चळवळ पुढे चालवण्यासाठी दिपक आगळे यांनी विरोधी पक्षनेते विखे यांच्या कार्यालयात निवेदन दिले. अतुल कदम, दादासाहेब नाबदे, विकास राजमाने, अशोक क्षिरसागर, नामदेव बोरुडे, अण्णासाहेब खाटिक, ग्रंथमित्र पोपटराव उगले, प्रा. गणेश वाळुजंकर, अशोक डौल, राजेश कोलते आदी यावेळी उपस्थित होते.