महाराजांची बदनामी खपवुन घेणार नाही- गायकवाड


बीड (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या वतीने शिक्षण विभागाअंतर्गत सर्वशिक्षा अभियानाच्या वतीने डॉ.सौ.सु.भा.साठे लिखित श्री.समर्थ रामदासी स्वामी या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बदनामी कारक मजकुर प्रकाशित करण्यात आला आहे. यामुळे देशातील सर्व शिवप्रेमी व संभाजीराजे प्रेमी यांच्या भावना दुखविण्याचा व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार शिक्षण विभागाने केला आहे.अतिशय चुकीचा इतिहास नव्या पिढीला शिकविला जात आहे. कुठलाही पुरावा नसताना पुर्वग्रह दुषित हेतुने सदरील पुस्तक लिहिण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक तात्काळ रद्द करून मागे घ्यावे नसता भिम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हा भरात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा भिम आर्मीचे विभागीय जिल्हाध्यक्ष गोपिनांथ गायकवाड, पंकज चांदणे, अमोल प्रधान,कैलाश गायकवाड, निखील कांबळे, यांनी दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget