रस्त्याच्या कामांना साबांकडून फासला जातोय हरताळ
शेवगांव प्रतिनिधी
तालुक्याच्या आ. मोनिका राजळे मतदारसंघात रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणत आहेत. मात्र असे असताना दुसरीकडे रस्त्यांच्या या कामांना हरताळ करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करत आहेत.
मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आ. राजळे या मतदारसंघातील कामाबाबत सतत पाठपुरावा करत आहेत. मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री सडक योजना प्रधानमंत्री सडक योजना तसेच ग्रास मंत्रालयाकडून मोठमोठ्या रस्त्यांची कामे मंजूर करून आणत आहेत. परंतु या कामांचे गांभीर्य असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या कमालीचा सावळा गोंधळ सुरु आहे. शेवगांव शहरातून पाच मुख्य रस्ते जातात. नेवासा, पैठण, गेवराई, नगर, पाथर्डी, मिरी असे राज्य महामार्ग या तालुक्यातून जात आहेत. या सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विशेष राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या, तेव्हा माती टाकून बुजविलेले खड्डे व दुभाजकांची अवस्था सर्वांनीच पाहिली.
तक्रारींचे निवेदन कोणाला द्यायचे ?
शहरामधील असलेल्या दुभाजकांवर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी या दुभाजकांचे सुव्यवस्थापन होऊन यावर दिशादर्शक फलक लावले जावेत. विविध तक्रारींसाठी निवेदन द्यायला सार्वजनिक बांधकाम विभागात गेलो असता तेथे कोणीही जबाबदार अधिकारी आढळले नाहीत. त्यामुळे निवेदन कोणाला देणार, हा मोठा गंभीर प्रश्न आहे.
नितीन मलानी, भाजपा उपाध्यक्ष.
Post a Comment