Breaking News

भाजपाच्या जि.प.सदस्याच्या बंधुने ऍट्रॉसिटीचा दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा


गेवराई,(प्रतिनिधी)ः- भाजपाचे जि.प.सदस्य प्रल्हाद माने यांचे बंधू विष्णू माने यांच्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऋषिकेश बेदरे व त्यांच्या सहकार्यांविरुद्ध दि. २६ स्पटेंबर रोजी गेवराई पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीसह दरोड्याचा गुन्हा दाखल झाला,राजकीय व्देषातुन दाखल झालेला ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा असुन अशा निराधार आणि बिनबुडाच्या आरोपामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे हा खोटा गुन्हा त्वरित रद्द करावा अशी मागणी रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर व त्यांच्या सहकार्र्यांनी केली आहे. गढी जिल्हा परिषद गटाचे भाजपा सदस्य प्रल्हाद माने यांच्या पत्नी सविता प्रल्हाद माने यांच्या नावाने परवाना असलेले लोकमंगल बिअरबार हे गढी-निपाणी जवळका रस्त्यावर आहे. दि. २५ स्पटेंबर रोजी रात्री १० बाजता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऋषिकेश बेदरे यांनी दारुची मागणी केली आणि बिल मागितले असता पैसे दिले नाहीत,पैशाची मागणी केली असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद भाजपा जि.प.सदस्य प्रल्हाद माने यांचे बंधु विष्णू माने यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीमध्ये गल्यातील सहा हजार रुपये काढुन घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ऋषिकेश बेदरे यांच्यासह विशाल लोणकर,केदार धुमाळ,राजेंद्र गिरे हे दि. ३ आक्टोबर रोजी गेवराई पोलीसांसमोर हजर झाले त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. ऋषिकेश बेदरे हे मराठा क्रांती मोर्चाचे सक्रीय कार्यकर्ते असुन अनेक अंदोलनात त्यांचा सहभाग आहे,यापुर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या अंदोलनात त्यांचे विरुद्ध गेवराई पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. 

जेम्सलेन प्रकरणातही ते आरोपी होते मात्र त्यांची या प्रकरणातुन निर्दोष मुक्तता झालेली आहे. बेदरे यांच्या विरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेवराई शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष किरण मोरे,प्रकाश साळवे,छगन खरात,अमर वडमारे,सचिन कांडेकर,कैलास माटे,शुभम सौंदरमल यांच्यासह इतरांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांची भेट घेवुन हा खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. अशा खोट्या गुन्ह्यामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण होत असुन पोलीसांनी हा गुन्हा रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने अंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी यावेळी दिला.